ओबीसी विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि विज्ञान विषयासाठी शिक्षक मिळणार, मंत्री अतुल सावे यांचा निर्णय

| Updated on: Dec 29, 2023 | 9:22 PM

राज्यातील खासगी अनुदानित उच्च माध्यमिक आश्रम शाळांसाठी शिक्षकांची रिक्त पदे भरण्याचा निर्णय इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी घेतला आहे. त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि विज्ञान विषयांसाठी शिक्षक मिळणार आहेत.

मुंबई | 27 डिसेंबर 2023 : राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि विज्ञान विषयासाठी शिक्षक मिळणार आहे. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. बायोलॉजी आणि मॅथ्स असेल तर त्यांना फिजिक्स केमेस्ट्रीसाठी दोन अतिरिक्त शिक्षक भरती करण्याची परवानगी शासनाने दिलेली आहे. एकूण 282 पदांना भरण्याची परवानगी दिली आहे. एकूण 141 खासगी अनुदानित उच्च माध्यमिक आश्रम शाळांसाठी 282 पदे मंजूर करण्यात आली आहे. ज्यांच्याकडे पदे कमी होती. त्यांना भरती करण्याची परवानगी दिली असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी म्हटले आहे. खासगी अनुदानित उच्च माध्यमिक आश्रम शाळांसाठी शिक्षक भरती होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा लाभ होणार आहे. राज्यातील एकूण 977 शाळांसाठी ही भरती होणार असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी म्हटले आहे.

Published on: Dec 27, 2023 04:08 PM
जागा वाटपावरून महायुतीत बेबनाव, छगन भुजबळ आणि संजय शिरसाट यांच्यात जुंपली
पराभवाचा वचपा काढणारच, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिले जलील यांना आव्हान