4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 12 June 2021
हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. येत्या चार तासांमध्ये याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत आणि उपनगर परिसरात बरसत असलेल्या पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. येत्या चार तासांमध्ये याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर या परिसरात शनिवारी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. त्यामुळे लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.