तर राज्यात पुन्हा मोठा भूकंप, आता काँग्रेस नेत्याने वर्तविले भाकीत

| Updated on: Jul 09, 2023 | 9:06 PM

काही आमदार अटी टाकून त्यांच्याकडे येत आहेत. आधी खोक्याची भाषा वापरली आता मंत्रीपदाची भाषा आहे. राज्याच्या प्रश्नाकडे कोणाचेच लक्ष नाही. या सगळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. सत्तेत राहण्यासाठी भ्रष्टाचार करणाऱ्यांना आता साथ देत आहेत.

कराड : राष्ट्रवादी काँग्रेस सोडून अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी पक्ष आणि चिन्ह यावर आपला दावा सांगितला असला तरी आतापर्यंत फुटीर गटाकडे 36 आमदार दिसत नाहीत. 36 पेक्षा जास्त आमदार दुसऱ्या गटात आहेत हे सिद्ध झाल्यास त्यांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावे लागेल. तसे झाले तरच त्यांचे निलंबन रद्द होईल असे कायदा सांगतो. आता काही आमदार अटी टाकून त्यांच्याकडे येत आहेत. आधी खोक्याची भाषा वापरली आता मंत्रीपदाची भाषा आहे. राज्याच्या प्रश्नाकडे कोणाचेच लक्ष नाही. या सगळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. सत्तेत राहण्यासाठी भ्रष्टाचार करणाऱ्यांना आता साथ देत आहेत. पक्षाच्या अध्यक्षांनी नऊ मंत्री यांचे निलंबन केले आहे मग विधानसभा अध्यक्ष कशाची वाट पाहत आहेत. हा संपूर्ण पक्षपातीपणा आहे. विधानसभा अध्यक्षाना शिवसेना निलंबनाबाबत दहा ऑगस्टपर्यंत निकाल द्यावा लागणार आहे. राज्यात वैध सरकार आहे की अवैध सरकार आहे हे यावरून ठरणार आहे. हा फक्त राष्ट्रवादीचा प्रश्न नाही तर राज्याचा प्रश्न आहे. त्यामुळे फुटीर गटाकडे 36 आमदार झाले नाहीत तर राज्यात पुन्हा मोठा भूकंप होईल असे भाकीत काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तविले आहे.

Published on: Jul 09, 2023 09:05 PM