औरंगजेबाचं स्टेटस काही थांबेना? एकामागून एक धक्कादायक प्रकार उघड; आता कोठे झाला गुन्हा दाखल
आधी अहमदनगर आणि नंतर कोल्हापुरात औरंगजेबाच्या नावाने गदारोळ झाला. तो शांत होतो ना होतो तोच आता यावरून अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहे. कोल्हापूर मधील प्रकारानंतर बीड येथेही हा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर आता हा प्रकार सोलापूरमध्येही समोर आला आहे.
सोलापूर : औरंगजेबावरून सध्या महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. आधी अहमदनगर आणि नंतर कोल्हापुरात औरंगजेबाच्या नावाने गदारोळ झाला. तो शांत होतो ना होतो तोच आता यावरून अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहे. कोल्हापूर मधील प्रकारानंतर बीड येथेही हा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर आता हा प्रकार सोलापूरमध्येही समोर आला आहे. येथील एका युवकावर औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील एका मुस्लिम युवकाने औरंगजेबाचे स्टेटस ठेवले होते. औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा स्थानिकांनी आरोप केला. शोएब मंगरूळकर असे स्टेटस ठेवणाऱ्या युवकाचे नाव आहे. ‘जल जल कर मर जाओगे, फिर भी तुम कुछ उखाड नही पाओगे’, असे त्याने लिहिले होते. आता या प्रकरणात गुन्हा दाखल झालाय. सोलापुरातील नवीन विडी घरकुल भागात हा प्रकार घडल्याची माहिती आहे.