“वैभव माझा मित्र, काही इच्छा असेल तर…”, भरत गोगावले आणि वैभव नाईक यांच्यामध्ये जुगलबंदी
महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं पावसाळी अधिवशेन सुरु आहे. काल आठव्या दिवशी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले आणि ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यात चांगलीच जुगसबंदी पाहायला मिळाली.
मुंबई, 28 जुलै 2023 | महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं पावसाळी अधिवशेन सुरु आहे. काल आठव्या दिवशी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले आणि ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यात चांगलीच जुगसबंदी पाहायला मिळाली. यावेळी भरत गोगावले यांनी वैभव नाईक यांना खुली ऑफर दिली. वैभव माझा मित्र, काही इच्छा असेल तर पूर्ण करू असं गोगवाले म्हणाले. गोगावले यांच्या विधानाला वैभव नाईक यांनी प्रतिउत्तर दिलं. यावेळी वैभव नाईक यांनी गोगावले यांचा रायगडचे भावी मंत्री असा उल्लेख केला. तसेच माझी काही अपेक्षा नाही, शेवटपर्यंत ठाकरेंसोबत राहणार असंही वैभव नाहईक म्हणाले.
Published on: Jul 28, 2023 10:06 AM