उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी शिक्षकाने 76 हजाराची नोकरी सोडली; कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर दाखल

| Updated on: Sep 02, 2022 | 9:03 PM

दिपक खरात असे या शिक्षकाचे नाव आहे. दिपक हे पुणे विभागतील वालचंद नगर शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांना दरमहा 76 हजार रुपये पगार मिळत होता. मात्र, शिक्षकाची नोकरी सोडून पूर्णवेळ शिवसेनेसाठी काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. आपल्या शकेडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी ते मोतोश्री वर दाखल झाले आहेत.

मुंबई : उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे(Eknath Shinde) गटातील वाद शिगेला पोहचला आहे. एकीकडे शिंदे गटाला महाराष्ट्रभर पाठिंबा मिळत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ मैदानात उतरत त्यांना साथ देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील एका शिक्षकाने 76 हजार रुपये पगार असलेल्या नोकरीवर पाणी सोडले आहे. नोकरी सोडून पूर्ण वेळ शिवसेनेसाठी काम करण्याचा निर्णय हा शिक्षकाने घेतला आहे.

शिवसेनेसाठी शिक्षकाने नोकरी सोडली

दिपक खरात असे या शिक्षकाचे नाव आहे. दिपक हे पुणे विभागतील वालचंद नगर शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांना दरमहा 76 हजार रुपये पगार मिळत होता. मात्र, शिक्षकाची नोकरी सोडून पूर्णवेळ शिवसेनेसाठी काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. आपल्या शकेडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी ते मोतोश्री वर दाखल झाले आहेत.

गद्दार आणि बंडखोरांमुळे शिवसेना अडचणीत आली आहे. या गद्दारांमुळे शिवसेना संपणार नाही. सच्चा शिवसैनिक हा उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहे. यामुळे पूर्ण पक्षासाठी काम करता यावे यासाठी नोकरीचा राजीनामा दिल्याचे या शिक्षकाने सांगीतले. शीवतीर्थावर खऱ्या शिवसेनेचा अर्थात उद्धव ठाकरेंचाच मेळावा होणार असल्याचा विश्वास देखील या शिक्षकाने व्यक्त केला आहे.

Published on: Sep 02, 2022 09:03 PM
Raj Thackeray : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरे बोलणार?
Ganesh Mandal : गणेश मंडळाच्या देखाव्याचा वाद, थेट कोर्टात खटला, काय आहे प्रकरण?