Aurangabad Robot Ganpati Arti | मेटलमन कंपनीत रोबोटच्या माध्यमातून गणपतीची आरती
Aurangabad Robot Ganpati Arti | औरंगाबाद येथील वाळूज एमआयरडीसीमधील कामगारांनी भन्नाट कामगिरी केली आहे. त्यांनी गणतपतीची आरती करणारा गणपती बाप्पा तयार केला आहे.
Aurangabad Robot Ganpati Arti | औरंगाबाद येथील वाळूज एमआयरडीसीमधील (Waluj MIDC) कामगारांनी भन्नाट कामगिरी केली आहे. त्यांनी गणतपतीची आरती करणारा गणपती बाप्पा तयार केला आहे. मेटलमन कंपनीतील (Metalman Company) कामगारांना ही भन्नाट आयडियाची कल्पना सुचली. त्यांनी तात्काळ त्यावर कामास सुरुवात केली. गणेशोत्सवात (Ganeshostav) आकर्षक देखावे, मेळावे आणि सोहळे साजरे करण्याची महाराष्ट्राची मोठी परंपार आहे. अनेक गणेश मंडळे यावर आघाडीवर असतात. नाविन्यपूर्ण कल्पना राबवून ते गणेशाची आरस करतात. कोणी नारळाचा बाप्पा तयार करतो. तर कोणी गोणपाटापासून आरस करतो. प्रत्येकाच्या तऱ्हा वेगवेगळ्या आहेत. बाप्पावर श्रद्धा असणारे अनेक जण नाविन्यपूर्ण रित्या हा सण दहा दिवस साजरा करतात. वाळूज एमआयडीसीतील कामगारांनीही असाच प्रयोग केला आहे.
Published on: Sep 05, 2022 02:19 PM