‘एप्रिल फूल’ डेला आपल्याकडे ‘अच्छे दिन’ म्हणतात; आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका

‘एप्रिल फूल’ डेला आपल्याकडे ‘अच्छे दिन’ म्हणतात; आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका

| Updated on: Apr 01, 2025 | 5:06 PM

शिवसेना उबाठा गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयांवर देखील यावेळी आदित्य ठाकरेंनी टीका केली.

जगभरात सर्वत्र आज ‘एप्रिल फूल’ डे सेलिब्रेट केला जात आहे. आपल्याकडे त्याला अच्छे दिन असं म्हणतात, आपलं सरकार हे एप्रिल फूल सरकार म्हणून घोषित करावं अशी टीका उबाठा गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केली आहे. लाडकी बहीण योजनेवरून आज आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला.

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, लाडकी बहीण योजनेमध्ये आधी अडीच हजार रुपये देण्याचं सांगण्यात आलं होतं. ते अजूनही 1500 हजार रुपये देत आहेत. मात्र आता ही योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे. लाडका भाऊ ही योजना बंद केली आहे. गेल्या 100 दिवसांमध्ये महाराष्ट्रात बरच काही घडताना दिसत आहे. मात्र या सरकारची एकदेखील नवीन योजना आणि काम समोर आलं नाही. त्याउलट जुन्या बंद करण्याचे काम त्यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असं सांगितलं होतं. पण आता असं काही होणारच नाही असं स्वतः उपमुख्यमंत्री सांगत आहेत, अशी टीका देखील आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

Published on: Apr 01, 2025 05:06 PM
Pune-Mumbai Expressway FASTag : पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, आज मध्यरात्रीपासून…
Suresh Dhas : ‘…त्यात तोंड घालू नका’, सुरेश धस अंजली दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले