अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची जोरदार टीका

| Updated on: Oct 05, 2024 | 2:02 PM

राहुल गांधी यांनी आपल्या कोल्हापूर दौऱ्यात केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकारने अग्निवीर योजना तर पेन्शन संपविण्यासाठी आणली असल्याची टीका त्यांनी केली आहे.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी कोल्हापूरात जोरदार भाषण केले. केंद्र सरकारने अग्निवीर नावाने पेन्शन काढून घेणारी योजना आणली आहे. या योजनेत सैन्यात दोन गट तयार केले आहेत. एका गटाला सर्वकाही सुविधा दिल्या जात आहेत. तर दुसऱ्या गटाला शहीद दर्जा, पेन्शन, रिस्पेक्ट, कॅंटीन, नुकसान भरपाई यातून वगळले जात आहे. अग्निवीरसाठीची भरती प्रक्रीयेला कोणताही प्रतिसाद नाही. कारण त्यांना हे सर्व माहिती आहे, की त्यांना कोणतेही संरक्षण मिळत नाही त्यामुळेच या गोंडस नावाच्या योजनेकडे तरुणांनी पाठ फिरविली असल्याचे राहुल गांधी यावेळी म्हणाले.पब्लिक सेक्टर गायब होत आहे. या त्याचे प्रायव्हटायझेन केले जात आहे. त्यामुळे आरक्षण नष्ट झाले आहे. मिडीयातून नेहमी देश सुपरपॉवर होत आहे. प्रगती होत आहे असे सारखे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात कोणतीही संस्था घ्या, त्यात दलित ,मागासवर्गाचे लोक कुठेच दिसत नाहीत असेही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले.

 

Published on: Oct 05, 2024 02:02 PM