राष्ट्रवादीवर ताबा मिळवण्यासाठी अजित पवार यांचं वेगवान पाऊल; पदाधिकाऱ्यांना दिले शपथपत्रांचे टार्गेट

| Updated on: Jul 28, 2023 | 11:08 AM

अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून पक्षावर दावा सांगण्यात आला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसवर ताबा मिळवण्यासाठी अजित पवार गटाने मोठं पाऊल उचललं आहे.

मुंबई, 28 जुलै 2023 | अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून पक्षावर दावा सांगण्यात आला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसवर ताबा मिळवण्यासाठी अजित पवार गटाने मोठं पाऊल उचललं आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदार आणि जिल्हाध्यक्षांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. आमदारांनी 10 हजार आणि जिल्हाध्यक्षांना 5 हजार शपथपत्र भरून देण्याचं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फूटीचे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगात गेल्यानंतर अजित पवार गटाकडून कागदपत्रांची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.

 

Published on: Jul 28, 2023 11:08 AM
मुंबईकरांनो काळजी घ्या… मुंबईतील ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस
यवतमाळ जिल्ह्यात पावसामुळे मोठं नुकसान; उमरी कापेश्वरजवळील पूल गेला वाहून