भरसभेत राज्यपालांवर अजित पवारांची टीका; म्हणाले, अरे काय तुम्ही करतायं???
राज्यपालांसह भाजपच्या नेत्यांवर अजित पवार यांनी टीका केली. तसेच राज्यपाल आणि भाजपच्या मंत्र्यांचा उल्लेख करत अरे काय करता हे. असे म्हटलं आहे.
मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर किंवा स्वराज्य रक्षक म्हणाव यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच अडचणीत आले. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. त्यानंतर अजित पवार यांनी आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगत. ते स्वराज्य रक्षकच होते असे म्हटलं होतं. यानंतर अजित पवारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली.
राज्यपालांवर टीका करताना अजित पवार म्हणाले, आपले राज्यपाल हे, “कल्पना करा की सावित्री बाईंचं लग्न 10 वर्षी झालं, तेव्हा त्यांच्या पतिचं वय हे 13 वर्ष होतं. कल्पना करा की लडके-लडकीया, मुलगा मुलगी लग्नानंतर काय करत असतील? लग्न झाल्यानंतर काय विचार करत असतील? असे म्हटलं होतं.अरे काय करता हे.
तर आपल्या एका मंत्र्यांने देखिल भिक मागून शाळा सुरू केल्याचे सांगत त्याकाळी महात्मा फुले यांचा टर्नओव्हर हा २० हजार रूपये होता. तर टाटांची प्रॉपर्टी ही १८ हजारांची होती. त्याकाळी ते सक्षम असताना देखिल यांची लोक मात्र म्हणातात की, महात्मा फुले, सावित्री बाई फुले आणि बाबासाहेब भिक मागून शाळा चालवायचे.