आपको औरंगाबाद में काम करना है ना? आमदाराची धमकी? गुणरत्न सदावर्तेंचे आरोप काय?
वंडर कन्स्ट्रक्शनला काम घ्यायचं होतं म्हणून बाबा कनष्ट्रक्शन कंपनीला संजय शिरसाठ यांनी धमकी दिली होती, असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय.
दत्ता कनवटे, औरंगाबादः वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी औरंगाबादेत आज शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यावर मोठा आरोप केलाय. औरंगाबादमधील बाबा कंस्ट्रक्शनला (Baba Construction) संजय शिरसाट यांनी धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केलाय. औरंगाबाद न्यायाधीश निवासस्थान प्रकरणी शिरसाट यांनी ही धमकी दिली. हे बांधकाम मिळावे, यासाठी दबाव टाकल्याचा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. ही संपूर्ण केस औरंगाबाद खंडपीठात सुरु असल्याचं त्यांनी म्हटलंय. आपको औरंगाबाद मे काम करना है? आम्ही तुम्हाला मारून टाकू अशी धमकी दिली होती,… वंडर कन्स्ट्रक्शनला काम घ्यायचं होतं म्हणून बाबा कनष्ट्रक्शन कंपनीला संजय शिरसाठ यांनी धमकी दिली होती, असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय.
Published on: Sep 28, 2022 03:55 PM