“पक्षात शिस्त लावायची असेल तर अजितदादांना प्रदेशाध्यक्ष करा”, राष्ट्रवादीच्या आमदाराची विनंती

| Updated on: Jun 25, 2023 | 4:11 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त अजित पवार यांनी आपल्या मनातली खंत बोलून दाखवली. विरोधी पक्षनेते पदामध्ये फार इंट्रेस्ट नव्हता या पदातून मला मुक्त करा आणि संघटनात्मक जबाबदारी द्या, अशी मागणी अजित पवार यांनी केली. अजित पवार यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद अजित पवार यांना दिलं जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली आहे.

धाराशिव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त अजित पवार यांनी आपल्या मनातली खंत बोलून दाखवली. विरोधी पक्षनेते पदामध्ये फार इंट्रेस्ट नव्हता या पदातून मला मुक्त करा आणि संघटनात्मक जबाबदारी द्या, अशी मागणी अजित पवार यांनी केली. अजित पवार यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद अजित पवार यांना दिलं जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “अजितदादा यांनी इच्छा व्यक्त करणं हे रास्त आहे. शेवटी पक्षाचे वरिष्ठ नेते शरद पवार हे निर्णय घेतील. माझी आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची इच्छा आहे की अजितदादा यांनी राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पदही सांभाळावं आणि भावी मुख्यमंत्री व्हावं. पक्षात कडक शिस्त लागावी यासाठी अजित पवार यांना प्रदेशाध्यक्ष करावे.”

 

Published on: Jun 25, 2023 04:11 PM
‘मागे फना काढला होता आता ढोंग करताय’; राऊत यांचा फडणवीस यांच्यावर हल्लाबोल, दिलं ओपन चॅलेंज
भावी मुख्यमंत्रीच्या चर्चेवर संभाजीराजे यांची प्रतिक्रिया, म्हणाले, ‘तुमची इच्छा…’