चोरलेला बाण एकनाथ शिंदेंवरच उलटणार, लिहून ठेवा; ‘या’ आमदाराचा ठाकरेंना जाहीर पाठिंबा अन् शिंदेंवर निशाणा
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. ते काय म्हणालेत पाहा...
नागपूर : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. “निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या किती दबावाखाली आहे हे आज महाराष्ट्राने पाहिले .पक्ष आणि चिन्ह गेलं तरी ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ या नावावर तीळ मात्र फरक पडणार नाही .उलट जो ‘बाण’ हिसकावून घेतलाय तोच ‘बाण’ शरसंधान केल्याशिवाय राहणार नाही. चोरलेला बाण एकनाथ शिंदेंवरच उलटणार, लिहून ठेवा”, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. “आरंभ है प्रचंड बोले मस्तकोंके झुंड आज जंग की घडी की तुम गुहार दो| आण बाण शान या की जान का हो दान| आज एक “धनुष के बाण” पे उतार दो| खऱ्या लढाईला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र द्रोह्याना जागा दाखविण्याची वेळ आली आहे, असंही अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
Published on: Feb 18, 2023 08:27 AM