मुंबईत शिंदे गटाची दुसरी शाखा उघडली; भरत गोगावलेंच्या हस्ते उद्घाटन
शिंदे गटातील आमदार आणि विभाग क्रमांक 6 चे विभागप्रमुख मंगेश कुडाळकर यांच्या नेतृत्वाखाली ही शाखा सुरु झाली आहे.
मुंबई : शिवसेना कुणाची यावरुन वाद सुरु असतानाच शिंदे गटाने आपला विस्तार वाढवायला सुरुवात केली आहे. मुंबईत शिंदे गटाची दुसरी शाखा सुरु झाली आहे. चुनभट्टी येथील अमेय इमारतीत ही शाखा सुरु करण्यात आलेय. शिंदे गटातील आमदार आणि विभाग क्रमांक 6 चे विभागप्रमुख मंगेश कुडाळकर यांच्या नेतृत्वाखाली ही शाखा सुरु झाली आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन झाले.
Published on: Sep 07, 2022 10:19 PM