महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा मृत्यू प्रकरणावर काँग्रेस नेत्याची मवाळ भूमिका; म्हणाले, मणुष्यवधाचा गुन्हा नको

| Updated on: Apr 17, 2023 | 1:29 PM

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मागणी करणार असल्याचे सांगत आपण राज्यपालांना पत्र लिहणार असल्याचे म्हटलं आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील हिच मागणी करत सरकारनं राजीमाना द्यावा असे म्हटलं आहे

नागपूर : पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात उष्मघातामुळे 50 हून अधिक सदस्यांना त्रास झाला आहे. या सोहळ्यात उष्माघातामुळे 11 श्रीसदस्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर कारवाईची मागणी होत आहे. राज्य सरकारला यासाठी जबाबदार धरत त्यांच्यावर मणुष्यवधाचा गुन्हा करावा अशी मागणी आता होत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मागणी करणार असल्याचे सांगत आपण राज्यपालांना पत्र लिहणार असल्याचे म्हटलं आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील हिच मागणी करत सरकारनं राजीमाना द्यावा असे म्हटलं आहे. तर संभाजी ब्रिगेडनेही कारवाईची मागणी केली आहे. यादरम्यान मात्र मणुष्यवधाचा गुन्हा सरकारवर दाखल करावा असं म्हणणार नसल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. ज्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. यावेळी वडेट्टीवार यांनी, धर्माधीकारी यांचा चाहता वर्ग पाहून कार्यक्रम घ्यायला हवा होता. तर ऐवढी गर्दी असताना पुरेशी व्यवस्था करायला हवी होती. मात्र सरकारच्या दुर्लक्षीत पणामुळे ही घटना घडली. याला सरकार दोषी आहे. याची पुनरावृत्ती होऊ नये असे म्हटलं आहे.

Published on: Apr 17, 2023 01:29 PM
श्रीसेवकांच्या भेटीसाठी राज ठाकरे एमजीएम रूग्णालयात; पाहा व्हीडिओ…
येत्या निवडणुकीत संभाजीराजेंशी हात मिळवणी करण्यासाठी ‘हा’ पक्ष तयार?; पाहा व्हीडिओ…