मुंबई, 02 ऑगस्ट 2023 | गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणपती बाप्पाच्या मुर्ती बनविण्याचे काम जोरदार चालू आहे. असं असताना पुन्हा एकदा चायनीज मुर्ती आणि पीओपी मुर्तीचा विषय ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात काल मुंबई महापालिकेत गणेशोत्सवाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली. ते म्हणाले की, “गणेशोत्सव मंडळाकडून 1 हजार रुपये प्रति मुर्ती अनामत रक्कम करण्यात आली होती, ती आता शंभर रुपये करण्यात आली आहे. सरसकट प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मुर्तीवरील बंदी हटवून त्यातल्या त्यात पर्यावरण पुरक गणशोत्साव कसा करता येईल हा निर्णय झाला.चायनीज गणेश मुर्तीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली.गणेश मंडळाच्या कार्यकरत्यावरील केसेस कशा मागे घेता येईल याचा आढावा घेण्यात आला.”