मविआत बिघाडी होणार का? अतुल भातखळकर यांच्या त्या विधानानंतर…

| Updated on: May 31, 2023 | 10:08 AM

सकाळने केलेल्या सर्व्हेमध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला भाजपपेक्षा जास्त मतं मिळतील असं समोर आलं आहे. यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "सकाळच्या सव्हेची हेडिंग पुन्हा एकदा मोदी यांना पसंती अशी आहे.

मुंबई : सकाळने केलेल्या सर्व्हेमध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला भाजपपेक्षा जास्त मतं मिळतील असं समोर आलं आहे. यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सकाळच्या सव्हेची हेडिंग पुन्हा एकदा मोदी यांना पसंती अशी आहे. त्यांच्या सर्व सॅम्पल सर्व्हेमध्ये पंतप्रधान म्हणून मोदींना पसंती मिळाली आहे आणि बहुतेक लोकांनी पुन्हा एकदा भाजपला मतदान करू हेच म्हटलं आहे. असे अनेक पक्ष मोदींच्या विरोधात एकत्र आले, पण त्यांचा पराभव झाला.त्या तीन पक्षांचं एकत्रीकरण हा वरवरचा दिखावा आहे. येणाऱ्या काळात महाविकास आघाडीची बिघाडी होईल, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली. तसेच पुण्याची पोटनिवडणूक लागलीच तर आम्ही ती लढायला तयार आहोत, आणि ती जिंकू ही असा विश्वास अतुल भातखळकर यांनी व्यक्त केला.

Published on: May 31, 2023 10:08 AM
कोकणवासियांसाठी महत्वाची बातमी! कशेडी घाट भुयारी मार्गातील एक मार्गिका खुली; पहा कोणाला जाता येणार?
…नाहीतर गौतमी पाटील हिनं बिहारला जावं, छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांनं पुन्हा डिवचलं अन् दिलं चॅलेंज