Imtiyaz Jalil Employment Fair | इम्तियाज जलील यांनी आयोजीत केलेल्या रोजगार मेळाव्याला तरुणांची गर्दी

| Updated on: May 07, 2022 | 7:34 PM

खासदार इम्तियाज जलील साहेबांनी सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी सुरू केलेल्या JOB ALERTS अंतर्गत औरंगाबाद शहरातील नामांकित कंपनी मध्ये युवकांना नौकरीची सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

औरंगाबादः औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी शहरातील बेरोजगार तरुणांसाठी नोकरीची सुवर्ण संधी (Job Apportunity) उपलब्ध करून दिली आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी आज JOB FAIR चे आयोजन केले असून त्यांच्या ऑफिसमध्ये यानिमित्त आज हजारो तरुणांची गर्दी पहायला मिळाली. शहरातील सुशिक्षित तरुणांनी (Educated youth) या मेळाव्यात उपस्थित राहून आपली पात्रता सिद्ध करावी आणि वेगवेगळ्या कंपन्यांसाठी मुलाखती द्याव्यात, असे आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केलं होतं. त्यानुसार अनेक तरुणांनी या मेळाव्याला प्रतिसाद दिला. वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रतिनिधीदेखील यावेळी उपस्थित होते.

Published on: May 07, 2022 07:34 PM
OBC नेते मोठ्या पदावर जात असल्यानं पोटात दुखलं, Chandrakant Patil यांची राज्य सरकारवर टीका
‘मोबाईलने आपलं जगणं खराब करुन टाकलं’, असं का म्हणाले नितीन गडकरी?