आमदार रवी राणांच्या फलकाला भाजपने फासले काळे; काय कारण?

| Updated on: Apr 26, 2023 | 8:21 AM

भाजपच्या माजी नगरसेवकांनी मंजूर करून आणलेल्‍या विकास कामांचे श्रेय रवी राणा घेण्‍याचा प्रयत्‍न करत असल्याचा आरोप भाजपच्याच माजी नगरसेवकांनी केला आहे.

अमरावती : बडनेरा मतदारसंघातील (Badnera Constituency ) माजी नगरसेवक हे आमदार रवी राणा यांच्याविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. येथे या नगरसेवकांनी रवी राणा (MLA Ravi Rana ) यांनी लावलेल्या विकास कामांच्या फलकाला काळे फासले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंद फुटले असून श्रेयवादावरून भाजप आणि आमदार रवी राणा आमने सामने आले आहेत. भाजपच्या (BJP) माजी नगरसेवकांनी मंजूर करून आणलेल्‍या विकास कामांचे श्रेय रवी राणा घेण्‍याचा प्रयत्‍न करत असल्याचा आरोप भाजपच्याच माजी नगरसेवकांनी केला आहे. त्याचबरोबर आक्रमक भूमिका घेत माजी सभागृह नेते तुषार भारतीय यांच्‍या नेतृत्‍वात आंदोलन केलं. त्याचबरोबर रवी राणा यांनी लावलेल्‍या फलकांना काळे फासले आणि फलकांची मोडतोड केली आहे. तर रवी राणा यांनी भाजपाला पाठिंबा दिला असून त्यांच्याविरोधात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला हा विरोध ‘घरचा अहेर’ मानला जात आहे.

Published on: Apr 26, 2023 08:19 AM
फडणवीस यांच्या ‘भावी मुख्यमंत्री’ बॅनरवरून ठाकरे गटाची सडकून टीका
अमरावतीत 274 जाहिरात होर्डिंग धोकादायक; मनपा अॅक्शन मोडवर, कारवाई होणार?