संजय राऊत आज बाहेर येणार का? ED ची ‘ती’ याचिकाही कोर्टाने फेटाळली!

| Updated on: Nov 09, 2022 | 3:28 PM

कोर्टाचे आदेश आणि त्यासंबंधीचे पेपर्स आर्थर रोड तुरुंगात आज पोहोचले तर संजय राऊत यांची आजच सुटका निश्चित आहे.

संजय राऊत आज बाहेर येणार का? ED ची ती याचिकाही कोर्टाने फेटाळली!
Image Credit source: social media
Follow us on

कृष्णा सोनारवाडकर, मुंबईः शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. शिवसेना ठाकरे(Thackeray) गटाच्या वतीने या सुनावणीनंतर राज्यभर जल्लोष होतोय. मात्र संजय राऊत बाहेर कधी येणार, हा प्रश्न सर्वांना पडलाय. यापुढील न्यायालयीन प्रक्रिया काय आहे, याबाबत लवकरच खुलासा होणार आहे. पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊत हे मास्टर माइंड आहेत, असा ईडीचा (ED) आरोप आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या जामीनाविरोधात ईडी आता हायोकोर्टात जाण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ईडीच्या वकिलांनी सत्र न्यायालयात जमीनाला स्थगिती देण्याची मागणी केली . ईडीच्या वकिलांनी विशेष पीएमएलओ कोर्टात ही मागणी केली . मात्र जामीनाला स्थगिती देण्याची मागणी कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे संजय राऊत आजच जेलमधून बाहेर येण्याची दाट शक्यता आहे.

कोर्टाचे आदेश आणि त्यासंबंधीचे पेपर्स आर्थर रोड तुरुंगात आज पोहोचले तर संजय राऊत यांची आजच सुटका निश्चित आहे. कोर्टातून ही सगळी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्याची शक्यता आहे.
पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी 31 जुलै रोजी संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना ईडीच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. संजय राऊत यांच्या जामीनासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरु होते.
अखेर विशेष पीएमएलए कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला. कोर्टाने 2 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांना सोडण्याचे आदेश दिले.