नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अन् सत्यजित तांबे यांची उमेदवारी मागच्या काही दिवसांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिली. यात काँग्रेसने सत्यजित तांबे यांच्याबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे अनेकजण नाराज आहेत. आता खुद्द काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. काँग्रेस पक्षात सुरु असलेलं राजकारण योग्य नाही. हे सगळं असंच सुरु राहीलं तर लवकरच काँग्रेसमध्ये दोन गट पडतील, असं पत्र बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींना लिहिलं असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. सत्यजित तांबे यांचा विजय झाला. पण पक्षातील सध्याचं राजकारण व्यथित करणारं आहे, असंही थोरात म्हणालेत.