Arvind Sawant : ‘वक्फ बिल का विरोध करनेवाले अरविंद सावंत’, वरळीत लागले सावंतांच्या विरोधात बॅनर

Arvind Sawant : ‘वक्फ बिल का विरोध करनेवाले अरविंद सावंत’, वरळीत लागले सावंतांच्या विरोधात बॅनर

| Updated on: Apr 10, 2025 | 11:47 AM

Waroli News : शिवसेना उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. वक्फ बिलाच्या मुद्द्यावरून ही बॅनरबाजी केलेली आहे.

शिवसेना उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. वरळी परिसरात अरविंद सावंत यांच्या विरोधातले बॅनर बघायला मिळाले आहेत. वक्फ बोर्ड विधेयकावरून अरविंद सावंत यांच्यावर टीका करण्यात आलेली आहे. अरविंद सावंत यांनी लोकसभेत वक्फ बोर्ड विधेयकाच्या विरोधात भूमिका मंडळी होती. त्यानंतर आता विरोधक आक्रमक झालेले आहेत. त्याच अनुषंगाने वरळीत ही बॅनरबाजी झालेली बघायला मिळाली आहे. ‘वक्फ बिल का विरोध करनेवाले अरविंद सावंत’ असं या बॅनरवर लिहिलेलं आहे. हे बॅनर कोणी लावले याबाबत अद्यापही कोणती माहिती मिळालेली नाही. मात्र हे बॅनर आता काढण्यात आले आहेत.

Published on: Apr 10, 2025 11:47 AM