’50 कुठं आणि 105 कुठं?, देवेंद्र फडणवीस बस नाम ही काफी है’, भाजपने बॅनर लावत शिवसेनेला डिवचलं

| Updated on: Jun 15, 2023 | 11:57 AM

कल्याण लोकसभेत गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलंच युद्ध रंगल्याचं पाहायला मिळतंय. त्यातूनच उल्हासनगर शहरात या दोन्ही पक्षांमध्ये बॅनरवॉर सुरू झाला होता.

Follow us on

ठाणे :  कल्याण लोकसभेत गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलंच युद्ध रंगल्याचं पाहायला मिळतंय. त्यातूनच उल्हासनगर शहरात या दोन्ही पक्षांमध्ये बॅनरवॉर सुरू झाला होता. शिवसेनेने खासदार श्रीकांत शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर लावल्यानंतर भाजपनेही ’50 कुठे आणि 105 कुठे? हा आमच्या भाजपचा मोठेपणा.. देवेंद्र फडणवीस साहेब नाम ही काफी है!’ असा मजकूर असलेला बॅनर उल्हासनगरच्या 17 सेक्शनच्या चौकात लावण्यात आला आहे. या बॅनर्सवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे. त्याखाली किंगमेकर असं लिहिलं आहे. याच बॅनर्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा आणि अमित शाह यांच्यासह पंकजा मुंडे तसेच रवींद्र चव्हाण यांचेही फोटो आहेत. उल्हासनगरला थेट मार्केट एरियामध्येच हे बॅनर्स लागले असल्याने उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे.