भाजप-शिवसेना शिंदे गटावर चंद्रशेखर बावनकुळे याचं मोठं वक्तव्य; म्हणाले, ‘कुठे असमन्वय…’

| Updated on: Jun 28, 2023 | 9:23 AM

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री शंभूराज देसाई, आणि मंत्री उदय सामंत उपस्थित होते. यादरम्यान बावनकुळे यांनी शिवेसना आणि भाजप भाऊ भाऊ आहेत असं मोठं वक्तव्य केलं. तर आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत.

मुंबई : शिवेसना शिंदे गट आणि भाजप यांच्यात बूथ स्तरावर समन्वय राहण्यासाठी आज येथे बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री शंभूराज देसाई, आणि मंत्री उदय सामंत उपस्थित होते. यादरम्यान बावनकुळे यांनी शिवेसना आणि भाजप भाऊ भाऊ आहेत असं मोठं वक्तव्य केलं. तर आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. एका परीवारातील दोन भाऊ असल्यामुळे कुठे असमन्वय झाला की तो समन्वय करावा लागतो असेही बावनकुळे यांनी म्हटलं आहे. तर यावर शंभूराज देसाई यांनी देखील ही युती मजबूत असल्याचे म्हटलं आहे. तर मंत्री उदय सामंत यांनी आम्ही जबाबदाऱ्या वाटून घेतलेल्या आहेत. आमच्यामध्ये विचार एक आहे. संवाद एक आहे. त्यामुळे गैरसमज करून घेण्याची काही गरज नाही असं म्हटलं आहे.

Published on: Jun 28, 2023 09:23 AM
Special Report | सालियान, सुशांत अन् यवतमाळची तरुणी, नारायण राणे यांच्या वक्तव्याने कोण गोत्यात येणार?
Special Report | दावे-प्रतिदावे, डिवचलं-सुनावलं; जळगावात एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस भिडले!