राज्यपाल भगतसिंह कौशारी यांनी महाराष्टातल्या लोकांबद्दल केलेल्या विधानाचे पडसाद राज्यभरात उमटले आहे. राज्यपालांच्या पोटातलं विष ओठांवर आलं असं म्हणत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी राज्यपालांवर टीका केली. मुंबईमध्ये सगळे गुण्यागोविंदाने राहतात मात्र राज्यपालांनी वादग्रस्त विधान करून दुही निर्माण केल्याचा आरोप अरविंद सावंत यांनी केला आहे. 106 जणांनी हुतात्म्य देऊन संयुक्त महाराष्ट्राची लढाई जिंकली आहे, अशावेळी या हुतात्म्यांच्या बलिदानाला डंक मारण्याचे काम राज्यपालांनी केले असल्याची खोचक टीकाही त्यांनी केली. राज्यपालांचे बोलविते धनी दिल्लीत असल्याचेही खासदार अरविद सावंत यावेळी म्हणाले.