शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते भाजपमध्ये जाणार? संजय राऊत यांच्या विधानावर, भरत गोगावले म्हणतात…

| Updated on: May 31, 2023 | 10:51 AM

संजय राऊत वारंवार लोकसभेच्या जागेवरून शिवसेनेला डिवचण्याचं काम करत आहेत. यावरून आता शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांचा ज्योतिष कधी खरा ठरला आहे का?

Follow us on

मुंबई : संजय राऊत वारंवार लोकसभेच्या जागेवरून शिवसेनेला डिवचण्याचं काम करत आहेत. यावरून आता शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांचा ज्योतिष कधी खरा ठरला आहे का? आत्तापर्यंत जेवढे त्यांनी सांगितले ते सगळं खोटं ठरलं आहे.ते बोलतात त्याचे उलट होतं. त्याची काळजी करायची गरज नाही.आम्हाला भाजपमध्ये जाण्याची आवश्यकता भासणार नाही. काही असेल तर आम्ही वरिष्ठांबरोबर चर्चा करून बघू. त्यांनी बोलत राहो आम्ही आमचं काम करत राहू, असं भरत गोगावले म्हणाले.तसेच अंबादास दानवे यांनी संदिपान भुमरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे काही गंभीर आरोप केले आहेत. यावरही भरत गोगावले यांनी प्रतक्रिया दिली आहे. अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते आहेत ते विरोधी पक्षनेते मात्र त्यांनी ठोस पुरावे सादर करावे, पुरावे आले तर त्याच्यावरती ॲक्शन करता येईल.