“या चिमन्यांनो परत फिरा रे!”, उद्धव ठाकरे बंडखोरांना परत पक्षात घेतील? पाहा काय म्हणाले भास्कर जाधव…

| Updated on: Jul 07, 2023 | 8:05 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या शपथविधीनंतर शिवसेनेच्या आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांचा राजीनामा, शिंदेंचे दोन आमदार भीडले, शिंदेंचे आमदार ठाकरेंच्या संपर्कात या सगळ्या घडामोडींवर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रत्नागिरी : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चटपटीत घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या शपथविधीनंतर शिवसेनेच्या आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांचा राजीनामा, शिंदेंचे दोन आमदार भीडले, शिंदेंचे आमदार ठाकरेंच्या संपर्कात या सगळ्या घडामोडींवर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी एवढंच सांगेन, शेवटी काल हे गेलेले लोक एकेकाळचे आमचे सहकारी होते. आम्ही काही वर्ष एकमेकांबरोबर कामे केलेली आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल माझ्या मनात नाही म्हटलं तरी सहानुभूती आहे. कोण परत येईल किंवा कोण परत येणार नाही, याबाबत बोलणार नाही. कारण तो माझा अधिकार नाही. पण एकदा कधीतरी आमच्यासारखे लोक शिवसेनेतून बाहेर पडलो होतो तेव्हा दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘या चिमन्यांनो परत फिरा रे’ असं आवाहन केलं होतं. मला शिवसेना प्रमुखांची आज आठवण येतेयं,” असं भास्कर जाधव म्हणाले.

Published on: Jul 07, 2023 08:05 AM
अजित पवार सुप्रिया सुळे यांच्या प्रमोशनवर नाराज? रोहित पवार यांचं मोठं विधान; म्हणाले, “दादा स्वतः असं…”
भाजपसोबत जाऊन चुकी झाली? बच्चू कडू स्पष्टच बोलले, “…तेव्हा चूक दुरुस्त करू”