MPSC च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन; अभिजीत बिचुकले यांनी काढला मधला मार्ग
अभिजीत बिचुकले यांनी MPSC आंदोलनातील मागण्यांवर तोडगा सांगितला आहे. शिवाय "फ्रॉम ब्रेन आयएम पॉलिटिशियन!", असंही बिचुकले म्हणालेत. पाहा...
पुणे : राज्यसेवेच्या वर्णनात्मक परीक्षा पद्धतीची अंमलबजावणी 2025 पासून सुरू या मागणीसाठी सलग चौथ्या दिवशीही एमपीएससीचं आंदोलन सुरू आहे. यावेळी बोलताना अभिजीत बिचुकले यांनी आंदोलनातील मागण्यांवर तोडगा सांगितला आहे. “माझ्या पत्नीला मुख्यमंत्री करा. ती मुख्यमंत्री झाल्यावर पहिला प्रश्न विद्यार्थ्यांचा सोडवेल हा शब्द आहे. आयोगाने या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मधला मार्ग काढला पाहिजे. आयोग म्हणतंय 2023 आणि विद्यार्थी म्हणतायत 2025 मात्र यामध्ये 2024 पासून नवा अभ्यासक्रम लागू करून मधला मार्ग काढावा, असा पर्याय अभिजीत बिचुकले यांनी सुचवला आहे. मला निवडणूक महत्वाची नसून मला या विद्यार्थ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत. त्यामुळे मी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आलोय, असंही बिचुकले म्हणाले. शिवाय “फ्रॉम ब्रेन आयएम पॉलिटिशियन!”, असंही बिचुकले म्हणालेत.
Published on: Feb 23, 2023 03:34 PM