केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे मुंबईत आज दौऱ्यावर आहेत. काल संध्याकाळी ते मुंबईत दाखल झाले होते. आज ते आपला नियोजित दौरा करत आहेत. लालबागच्या राजाचं (Lalbag Cha Raja) अमित शाह यांनी दर्शन घेतलं. हा मंडळासाठी अभिमानास्पद क्षण होता. ते दरवर्षी इथं येत असतात. लालबागचा राजाचे अमित शाह हे निस्सिम भक्त आहेत, अशी प्रतिक्रिया लालबागचा राजा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. अमित शाहांनी वांद्रेतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची भेट, बाप्पाच्या दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी विशेष अभिप्रायही लिहून दिला.