Kirit Somaiya Dapoli Protest | भाजप नेते किरीट सोमय्यांचा आज दापोलीत मोर्चा – tv9
आदित्य ठाकरे यांच्या आशीर्वादाने तेथे समुद्रात स्टुडिओ आणि येथे उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने दापोलीच्या समुद्रात रिसॉर्ट होतो. याची उत्तरे द्यावीच लागणार आहेत.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते अनिल परब यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. किरीट सोमय्या हे आज पुन्हा एकदा दापोली दौऱ्यावर असून ते तेथे मोर्चा काढणार आहेत. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी हे पोलिस अधिक्षक यांना, या सगळ्या संदर्भात कारवाई का केली नाही, फौजदारी कारवाई आतापर्यंत का करण्यात आली नाही याबाबत जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितलं. तसेच तर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही याबाबत उत्तरे द्यावी लागणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या आशीर्वादाने तेथे समुद्रात स्टुडिओ आणि येथे उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने दापोलीच्या समुद्रात रिसॉर्ट होतो. याची उत्तरे द्यावीच लागणार आहेत. तसेच यावेळी सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांना इशारा देत, समय बडा बलवान है, हिशोब तर द्यावाच लागेल असेही म्हटलं आहे.
Published on: Aug 27, 2022 09:58 AM