माजी सैनिक सूर्यकांत पवार यांच्या मुलाची पडळकरांच्या विरोधात बॅनरबाजी

| Updated on: Mar 30, 2023 | 7:53 AM

पुण्यातील एका सैनिकाच्या मुलग्याने पोस्टरबाजीतून पडळकरांचा निषेध व्यक्त करत आम्ही तुम्हाला कधीही माफ करून शकणार नाही असा इशारा दिला आहे

पुणे : भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे शरद पवार यांच्या कुटुंबियांवर सतत आरोप करत असतात. ते अजित पवार, सुप्रीया सुळे आणि रोहित पवार यांना त्यांचा निशाना बनवत असतात. दोन दिवसापूर्वी गोपीचंद पडळकर यांनी इंदापूर येथे शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापलेले आहे. तर पडळकर यांच्या निषेधार्थ आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे

याचदरम्यान आता पुण्यात एका पोस्टरची जोरदार चर्चा रंगली आहे. या पोस्टरमधून पडळकरांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यात ते पोस्टर कोणाचं अशी चर्चा होताना दिसत आहे. पुण्यातील एका सैनिकाच्या मुलग्याने पोस्टरबाजीतून पडळकरांचा निषेध व्यक्त करत आम्ही तुम्हाला कधीही माफ करून शकणार नाही असा इशारा दिला आहे. माजी सैनिक स्वर्गीय सूर्यकांत लालाजी पवार यांच्या मुलाने ते पोस्टर लावले आहेत. तर देशासाठी प्राण हातावर घेऊन लढणारे आम्ही पवार महाराष्ट्राला लागलेली कीड? आमदार गोपीचंद पडळकर आम्ही तुम्हाला माफ करू शकणार नाही असा इशारा सूर्यकांत लालाजी पवार यांच्या मुलाकडून देण्यात आला आहे

Published on: Mar 30, 2023 07:52 AM
शिवसेना नेत्याचा संजय राऊत यांच्यावर निशाणा; म्हणाले, जनतेनंचं डिलिट केलं
श्रीराम, भगवं रक्त आणि हिंदुत्व; रामनवमीच्या दिवशी शिवसेनेच्या नेत्याचं ठाकरेगटावर टीकास्त्र