Budget 2024 | अर्थसंकल्पाचे नियोजन सरकार कसे करते ? कसा पैसा खर्च होतो

| Updated on: Jan 29, 2024 | 2:07 PM

केंद्र सरकार 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहे. अर्थसंकल्प सादर करताना सरकार जमा खर्चाचे नियोजन कसे करते ? कसा अर्थसंकल्प सादर केला जातो. जसे आपण घरखर्चाचा अंदाज बांधतो तसेच सरकार अर्थसंकल्प तयार करताना योजनांसाठी पैसा बाजूला काढते. चला तर पाहूयात कसा अर्थसंकल्प तयार होतो.

मुंबई | 29 जानेवारी 2024 : 1 फेब्रुवारी रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम बजेट सादर करतील. बजेटनंतर लोकसभा निवडणूका जाहीर होतील. नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर पूर्ण अर्थसंकल्प सादर होईल. अर्थसंकल्पात केंद्र सरकार अनेक योजनांची तरतूद करते. तर नवीन योजनांसाठी आर्थिक निधी बाजूला ठेवते. या खर्चाचे नियोजन कसे केले जाते हे पाहुयात. आपण घर खर्चासाठी जशी तरतूद करतो तसेच नियोजन केंद्र सरकार करते. खर्चासाठी हा अर्थसंकल्प तयार करण्यात येतो. प्रत्येक वर्षी अर्थमंत्री बजेट सादर करतात. त्यात सरकार अगोदर आवक किती आहे, महसूल किती जमा होणार याचा अंदाज बांधते. तरीही अनेकदा केंद्रीय रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घ्यावे लागते. सरकार उत्पन्न आणि कर्ज याचा अंदाज बांधते. त्याआधारे केंद्रीय बँकेकडून किती कर्ज घ्यायचे याचे नियोजन केले जाते. सर्वसाधारण अर्थसंकल्पात सरकारचा खर्च आणि कमाई यांचा लेखाजोखा असतो. घराच्या बजेटमध्ये किती कमाई, पैसा कुठे खर्च होणार आणि बचत किती होणार याचा अंदाज लावण्यात येतो. दर महिन्याच्या सरावातून त्याचा एक अंदाज येतो. येणाऱ्या आर्थिक वर्षासाठी पैशाची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येते. आणि मग त्याचे नियोजन करण्यात येते. पैशाची आवक आणि जावक याची सांगड घालण्याचा प्रयत्न करण्यात येतो.

Published on: Jan 29, 2024 02:06 PM