Nashik | नगरसेवकांचे मोफत लसीकरण फलक लावून प्रचार, मनपा आयुक्तांनी फलक काढण्याचे दिले आदेश
लसीकरण केंद्रांवरचे 'मोफत लसीकरण' चे सर्व फलक हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शासन पैसे भरत असल्याने नगरसेवकांकडून नागरिकांची दिशाभूल होत असल्याचा आरोपही केला गेला.
नाशिक : शासनाच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू असताना ही नाशिकमध्ये मात्र लसीकरणाच्या नावाखाली लसीकरण केंद्रांवर आपले स्वतःचे फलक लावत, आपला प्रचार करत काही नागरसेवक राजकीय पोळी भाजत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर अशा नगरसेवकांना महापालिका आयुक्तांनी दणका दिला. लसीकरण केंद्रांवरचे ‘मोफत लसीकरण’ चे सर्व फलक हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शासन पैसे भरत असल्याने नगरसेवकांकडून नागरिकांची दिशाभूल होत असल्याचा आरोपही केला गेला. त्यामुळे लसीकरणाच्या नावाखाली स्वतःचा प्रचार थांबवा असा आयुक्तांनी सर्वपक्षीय नगरसेवकांना स्पष्ट इशारा दिला.