Pune Car Accident CCTV : अंगावर काटा आणणारी अपघाताची घटना CCTV मध्ये कैद

| Updated on: Apr 27, 2022 | 8:05 PM

20 एप्रिलला दिवसा घडलेल्या या घटनेत संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. रस्त्याच्या कडेला ही व्यक्ती झोपलेली होती.

पुणे : शहरात दिवसा ढवळ्या एका व्यक्तिच्या अंगावरून गाडी घालण्याची घटना समोर आली असून यामुळे खळबळ उडाली आहे. तर रस्त्याच्या कडेला झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर गाडी घातल्याप्रकरणी पुण्यातील (Pune) व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 20 एप्रिल रोजी पुण्यातील सॅलिसबरी पार्कात ही घटना घडली होती. त्यानंतर या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. यावेळी एक व्यक्ती फुटपाथच्या बाजूला झोपली होती. त्यावेळी गाडी पुढे घेताना अंदाज न आल्याने या व्यावसायिकाने अंगावरून गाडी चालवल्याचे दिसत आहे. त्यानंतर याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस (Market police) ठाण्यात अनूप मेहता या व्यावसायिकावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला अटक (Arrest) करण्यात आली आहे.

Published on: Apr 27, 2022 08:02 PM
Video : इंधन दरवाढीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाष्य, म्हणाले…
Rajesh Tope : ‘लहान मुलांच्या लसीकरणावर भर देणार’; आरोग्यमंत्र्यांची माहिती