कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिलाच पाहिजे पण…; ठाकरेगटाच्या नेत्याची मागणी
Chandrakant Khaire on Abdul Sattar : शिवसेना ठाकरेगटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली आहे. पाहा खैरे नेमकं काय म्हणालेत...
छत्रपती संभाजीनगर : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आता राजीनामा दिला पाहिजे पण मिंदे गट हा राजीनामा घेणार नाही, असं म्हणत शिवसेना ठाकरेगटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी टीका केली आहे. काल माध्यमांशी बोलताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या आताचं नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या अनेक वर्षापासून होतच आहे, असं म्हटलं. या वक्तव्यामुळे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे चांगलेच वादाच्या भवऱ्या सापडले आहेत. तर दुसरीकडे चंद्रकांत खैरे यांनी देखील अब्दुल सत्तार यांच्या राजीनामाची मागणी केली आहे. मात्र मिंदे गट हा राजीनामा घेणार नाही, असं चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत. कृषिमंत्री हे त्याच लोकांकडे जातात ज्या लोकांसोबत त्यांचा काही व्यवहार आहे, असंही खैरे म्हणालेत.
Published on: Mar 14, 2023 09:00 AM