Chandrakant Khaire : दानवेंच्या नावाचं गार्‍हाणं घेऊन खैरे मातोश्रीवर दाखल

Chandrakant Khaire : दानवेंच्या नावाचं गार्‍हाणं घेऊन खैरे मातोश्रीवर दाखल

| Updated on: Apr 15, 2025 | 3:19 PM

Khaire - Danve Dispute : दानवेंची तक्रार घेऊन चंद्रकांत खैरे आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत. त्यांच्यात काय चर्चा होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

शिवसेना उबाठा गटाचे माजी खासदार नेते चंद्रकांत खैरे हे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील एका कार्यक्रमाला चंद्रकांत खैरे यांना निमंत्रण न दिल्याने खैरे यांनी संताप व्यक्त करत, अंबादास काड्या करतो, त्याची तक्रार मातोश्रीवर करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर, आज लगेच ते मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.

मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला माजी खासदार खैरे पोहोचले असून आमदार अंबादास दानवे यांच्याबद्दल ते तक्रार करणार आहेत. अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात सुरू असलेल्या वादानंतर खैरे हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाल्याने दोघांमध्ये नेमकं काय चर्चा होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Published on: Apr 15, 2025 03:19 PM