लवकरच अनेक पक्षांत बॉम्बस्फोट, मविआला उमेदवारही मिळणार नाहीत, भाजपच्या नेत्याचा मोठा दावा!

| Updated on: Nov 05, 2022 | 3:57 PM

एकनाथ शिंदे गट आणि भाजपच्या युतीचे सरकार पडण्याच्या चर्चा सध्या राज्यात रंगल्या आहेत.

लवकरच अनेक पक्षांत बॉम्बस्फोट, मविआला उमेदवारही मिळणार नाहीत, भाजपच्या नेत्याचा मोठा दावा!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः शिंदे – फडणवीस (Eknath Shinde-Devendra Fadanvis)सरकार पडण्याच्या चर्चांनी राज्यात चांगलाच जोर धरलाय. त्यातच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी भाजपकडून काँग्रेसचे उमेदवार फोडले जातील, असं वक्तव्य केल्याने वेगाने प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनीही प्रतिक्रिया दिली. चंद्रकांत खैरे हे शिवसेनेचे ज्येष्ठ आणि देशातले मोठे नेते आहेत. त्यांच्या वक्तव्यावर मी बोलणार नाही, पण आगामी काळात सर्वच पक्षांमध्ये मोठे बॉम्बस्फोट घडणार आहेत, असं भाकित चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय.

चंद्रशेखर बावनकुले म्हणाले, हे सत्य आहे. महाविकास आघडीतील तिनही पक्ष प्रवेशाचे बॉम्बस्फोट आगामी काळात दिसतील. विधानसभा, लोकसभा निवडण

मविआमधील तिन्ही पक्ष प्रवेशाचे बॉम्बस्फोट दिसतील. महाविकास आघाडीला आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवार मिळणं कठीण होईल, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुले यांनी केलंय.

नाना पटोले सध्या अस्वस्थ आहेत. सरकार गेल्यामुळे त्यांची ही अवस्था आहे. लाचार, दुराचार, भ्रष्टाचार यासाठी हे तीन लोक एकत्र आले होते… एक दिल के टुकडे हुए हजार, कोई कहा गिरा, कोई कहा गिरा..अशी अवस्था त्यांची झाल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.

मूळ विचाराचे काँग्रेसचे लोक आपल्याच चुकीमुळे नाराज आहेत. बेईमानी करून सरकार स्थापन केलं. काँग्रेस उद्धवजींसोबत गेल्याने पक्षातील अनेक लोक नाराज आहेत. ते आता भाजपमध्ये प्रवेश करतील. त्यामुळे उद्धव ठाकरे, युतीबद्दल ते टीका करतायत. ते आपापसात ते सर्व रंगलेलं आहे, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

एकनाथ शिंदे गट आणि भाजपच्या युतीचे सरकार पडण्याच्या चर्चा सध्या राज्यात रंगल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वात आधी हे वक्तव्य केलं.

शिर्डी येथील राष्ट्रवादीचं अधिवेशन झाल्यानंतर सरकार पडेल, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यानंतर अजित पवार, अमोल मिटकरींनीही अशी वक्तव्य केली. आजच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरेंनीही देवेंद्र फडणवीस काँग्रेसचे 22 आमदार फोडण्याच्या तयारीत आहेत, असं वक्तव्य केलं. त्यानंतर काँग्रेस आणि शिवसेनेत अंतर्गत वाद झाल्याची माहिती समोर आली.