“मोदी केवळ गुजरातचे पंतप्रधान नाही”, गुगलची गुंतवणूक गुजरातमध्ये गेल्याने छगन भुजबळ यांची टीका
पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यानंतर गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी एका कराराची घोषणा केली आहे. यानुसार, गुजरातमध्ये लवकरच गुगलचं ग्लोबल फिनटेक ऑपरेशन सेंटर उघडण्यात येणार आहे. वेदांता, मायक्रॉन सेमीकंडक्टरसारखे काही प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर आता नवी गुंतवणूकही गुजरातकडे जात असल्याने राज्यातील विरोधकांकडून सरकारला लक्ष्य केलं जात आहे.
अहमदनगर : पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यानंतर गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी एका कराराची घोषणा केली आहे. यानुसार, गुजरातमध्ये लवकरच गुगलचं ग्लोबल फिनटेक ऑपरेशन सेंटर उघडण्यात येणार आहे. वेदांता, मायक्रॉन सेमीकंडक्टरसारखे काही प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर आता नवी गुंतवणूकही गुजरातकडे जात असल्याने राज्यातील विरोधकांकडून सरकारला लक्ष्य केलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे.”महाराष्ट्र उद्योग धंद्याच्या बाबतीत एक नंबरवर राहिला आहे. राज्यात सर्व सोईसुविधा करण्याचं काम आतापर्यंतच्या मुख्यमंत्री आणि सरकारने केलं आहे. अशावेळी देशाचे पंतप्रधान हे केवळ गुजरातचे पंतप्रधान नाहीत. त्यांनी हे परदेशातील उद्योगधंदे देशात आणावे आणि त्या उद्योगधंद्यांना राज्यात कुठे जावं याची मुभा द्यावी.उद्योगधंदे अट टाकून आणणे हे पंतप्रधान यांनी जर केलं असेल ते चूकीच आहे,”असं भुजबळ म्हणाले.