Chhaava Movie : संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदार राहणार उपस्थित

| Updated on: Mar 24, 2025 | 10:41 PM

Chhava Movie Screening In Sansad : येत्या गुरुवारी संसदेत छावा चित्रपट दाखवला जाणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यासह खासदार उपस्थित असणार आहे.

संसदेत आता छावा चित्रपट दाखवला जाणार आहे. येत्या गुरुवारी संसदेत छावाचं स्क्रीनिंग केलं जाणार आहे. संसदेत असलेल्या ग्रंथालयाच्या हॉलमध्ये हे स्क्रीनिंग होणार आहे.

छत्रपती संभाजीमहाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या छावा या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. संभाजी महाराजांचा इतिहास पहिल्यांदा मोठ्या स्क्रीनवर आल्याने या चित्रपटाला पसंती मिळत आहे. त्याच अनुषंगाने हा चित्रपट आता संसद भवनात देखील दाखवला जाणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदींसह देशातील खासदार उपस्थित असणार आहेत. तसंच चित्रपटातील दिग्दर्शक तसंच कलाकार देखील या स्क्रीनिंगच्या वेळी संसदेत उपस्थित असणार आहेत.

Published on: Mar 24, 2025 10:40 PM
Satara News : मन सुन्न करणारा व्हिडिओ व्हायरल झाला; अन् एकनाथ शिंदेंनी ‘त्या’मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
Dharavi Blast : धारावीत ब्लास्ट, 10 हून अधिक सिलिंडरचा लागोपाठ भीषण स्फोट, क्षणार्धात सगळं भस्मसात अन् …