Cabinet Expansion : ‘आता वर्षाचे दरवाजे खुले’, शिंदे गटाच्या आमदाराचा ठाकरे याचं नाव न घेता टोला; तर म्हणाला, ‘आता 20-20 चे दिवस’

| Updated on: Jun 06, 2023 | 11:20 AM

तर या मंत्रिमंडळ विस्तारात काही जणांना संधी मिळण्याची शक्यता आहे. यावरून शिंदे गटाचे आमदार आशिष जैस्वाल यांनी मुंबई दौरा आखला आहे. त्यावरून सध्या त्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळेल अशी चर्चा सुरू असतानाच त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली यांच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान आता कॅबिनेट विस्ताराच्या चर्चांना उत आला आहे. लवकर मंत्रिमंडळ विस्तार केला जाण्याची शक्यता आहे. तर या मंत्रिमंडळ विस्तारात काही जणांना संधी मिळण्याची शक्यता आहे. यावरून शिंदे गटाचे आमदार आशिष जैस्वाल यांनी मुंबई दौरा आखला आहे. त्यावरून सध्या त्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळेल अशी चर्चा सुरू असतानाच त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आता 20-20 चे दिवस आहे. तर लोकसभेला फक्त 10 महिने उरले. त्यामुळे प्रत्येक बॅालवर छक्का मारणाऱ्या आमदाराला मंत्री करा असे म्हटलं आहे. तर वर्षा बंगल्याचे दरवाजे हे आता सर्वांसाठी खुले झाले आहेत असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टोमना मारला आहे. तर काही विषयांवर चर्चा करण्यासाठी आपण मुंबईत जातोय असे त्यांनी म्हटलं आहे. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील जी संधी देतील त्याचं मी सोनं करेन असेही ते म्हणालेत.

Published on: Jun 06, 2023 11:18 AM
उद्धव ठाकरेंसाठी ठाकरेंसाठी हा मावळा उभा ठाकला; म्हणाला, “हेच आमचं कर्तव्य”
संगमनेरमध्ये सकल हिंदू समाजाचा आक्रोश मोर्चा, काय आहे कारण?