बाळासाहेब थोरात यांच्या मागणीवर मुख्यमंत्री शिंदे यांचा टोला; म्हणाले, ‘ही मागणी हास्यास्पद’

बाळासाहेब थोरात यांच्या मागणीवर मुख्यमंत्री शिंदे यांचा टोला; म्हणाले, ‘ही मागणी हास्यास्पद’

| Updated on: Jul 16, 2023 | 9:58 AM

तर एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत, पण आता तीन तलवारी एका म्यानात आहेत त्यामुळे ते एकमेकांना समजून घेऊन चांगला राजकारभार करतील असे वाटत नसल्याची टीका त्यांनी केली होती.

मुंबई : काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जोरदार टीकास्त्र सोडलं. एका वर्षात दोनदा पक्ष फोडणं कधी आजपर्यंत झालेलं नव्हतं असं ते म्हणाले. तर एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत, पण आता तीन तलवारी एका म्यानात आहेत त्यामुळे ते एकमेकांना समजून घेऊन चांगला राजकारभार करतील असे वाटत नसल्याची टीका त्यांनी केली होती. तर महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता राज्यात थेट राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. त्यावरून मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्युत्तर देताना थोरात यांना टोला लगावला आहे. यावेळी शिंदे यांनी, आमच्याकडे २१० आमदार आहेत. तर थोरात यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणे हेच हास्यास्पद असल्याचं ते म्हणाले. तर मंत्री राहिलेला माणूसाने सत्ताधाऱ्यांकडे २१० आमदारांचं संख्याबळ असताना राष्ट्रपती राजवटीची मागणी करणं हे हास्यस्पद आहे. लोकशाहीत बहुमताला महत्त्व असतं असेही ते म्हणालेत.

Published on: Jul 16, 2023 09:58 AM