महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कुणाच्या इशाऱ्यावर काम करतात ? जयंत पाटील यांचा सवाल

| Updated on: Sep 14, 2022 | 10:57 PM

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. प्रकल्प गुजरातला जात असताना कोण कोण गप्प बसलं? याचं उत्तर सत्तारुढ पक्षाला द्यावंच लागेल असे जयंत पाटील म्हणाले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कुणाच्या इशाऱ्यावर काम करतात ? जयंत पाटील यांचा सवाल
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुणाच्या इशाऱ्यावर काम करतात ?  असा सवाल राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील( Jayant Patil) यांनी उपस्थित केला आहे. वेदांता आणि फॉसकॉनच्या सेमी कंडक्ट (Vedanta-Foxconn Joint Venture) हा महाराष्ट्रातील 1.54 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. यावरुन महाराष्ट्रात राजकीय रणकंदान माजले आहे.

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. प्रकल्प गुजरातला जात असताना कोण कोण गप्प बसलं? याचं उत्तर सत्तारुढ पक्षाला द्यावंच लागेल असे जयंत पाटील म्हणाले.

हा प्रकल्प सुमारे पावणे दोन लाख कोटींचा होता. याच्याशी संबंधित 160 इंडस्ट्री राज्यात येणार होत्या. त्यातून 70 हजार रोजगार निर्मिती होणार होती.

वेदांता प्रकल्प आला असता तर महाराष्ट्रातील तरुणांना याचा फायदा झाला असता. आमचं सरकार होतं तेव्हा फॉसकॉन्सच्या लोकांना सुभाष देसाई भेटले होते असेही जयंत पाटील यांनी सांगीतले.

या प्रकल्पासाठी तळेगावची जागा पूर्णपणाने मान्यता असणारी आहे. आता प्रकल्प गुजरातला गेलाय.  त्या ठिकाणी दलदल आहे. त्यामुळे कंपनीचं नुकसान होणार आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

आमचं सरकार असताना ३९ हजार कोटींच्या सवलती देऊ केल्या होत्या. आता केंद्राने काही बदल केल्या की काय माहिती नाही. पण महाराष्ट्राने हा प्रकल्प गमवण्याचं कुठलंही कारण नाही.

त्यांच्यावर कदाचीत दबाव आहे म्हणून त्यांना तसं बोलावं लागत असेल. पण महाराष्ट्र गुजरातच्या कितीतरी पट पुढे आहे असा असताना प्रक्लप येथून गेला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कुणाच्या इशाऱ्यावर काम करतात ? असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे जयंत पाटील म्हणाले.