मुख्यमंत्री शिंदे यांचा पंढरपुरात पाहाणी दौरा; रस्ते खड्डेमुक्त करण्याचे दिले आदेश
वारकऱ्यांसाठी केलेल्या सुविधांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पंढरपुरात येऊन पाहणी केली. मुख्यमंत्र्यांनी रस्त्यांपासून ते चंद्रभागेतील साफसफाईपर्यंत सगळी चौकशी केली. तसेच पंढरपुरातील रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री शिंदेंनी दिल्या आहेत.
सोलापूर: वारकऱ्यांसाठी केलेल्या सुविधांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पंढरपुरात येऊन पाहणी केली. मुख्यमंत्र्यांनी रस्त्यांपासून ते चंद्रभागेतील साफसफाईपर्यंत सगळी चौकशी केली. तसेच पंढरपुरातील रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री शिंदेंनी दिल्या आहेत. ते म्हणाले की, “ज्या रोडवर आपण उभे आहोत तिथे चिखल होता, इथे कॉन्क्रीटचा रस्ता पाहतोय. सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. वारकऱ्यांना रांगेत त्रास होऊ नये म्हणून मंडप उभारला आहे. चंद्रभागेच्या तिराशी व्यवस्था केली आहे. आरोग्य तपासण्यांचं नियोजन केलं आहे. पोलिसांनी सूरक्षेच्या दृष्टीने काळजी घेतली आहे. सर्व काम अतिशय चांगलं सुरु आहे. मी देखील मुंबईवरुन काही अधिकारी तयारीसाठी पाठवले. 10 ते 15 लाख लोकं येतील त्यांना अडचण होणार नाही. एसटीच्या जादा गाड्या सोडल्या आहेत, टोल फ्रि केला आहे. 15 लाख वारकऱ्यांचा आपण विमा काढलेला आहे.”