इंडोनेशियामधून कोळशाची आयात, राज्यात पुन्हा वीज दरवाढीची शक्यता
सध्या राज्यात कोळशाची टंचाई आहे. कोळसा टंचाई दूर करण्यासाठी इंडोनेशियामधून कोळसा आयात करण्यात येणार आहे. मात्र हा कोळसा महाग असल्याने राज्यात पुन्हा एकादा वीजेच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्यात सध्या कोळशाची टंचाई आहे. कोळशाची टंचाई असल्यामुळे वीज उत्पादनात घट झाली असून, नागरिकांना भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान आता कोळसा टंचाई दूर करण्यासाठी इंडोनेशियामधून कोळसा आयात करण्यात येणार आहे. इंडोनेशियामधून महाराष्ट्रात 20 लाख मेट्रिक टन कोळसा आयात करण्यात येणार आहे. मात्र हा कोळसा महाग असल्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांना वीज दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे.