Jayant Patil यांनी बेकायदेशीरपणे एसटी चालवल्याविरोधात भाजपकडून तक्रार दाखल-tv9

| Updated on: Aug 17, 2022 | 5:28 PM

जयंत पाटील यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर आगारामध्ये जाऊन एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर त्यांनी आगारामध्ये एसटी चालवली होती. त्याविरोधात आता भाजपकडून आक्षेप घेण्यात आला आहे.

सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे माजी मंत्री जयंत पाटील यांनी दोन दिवसांपुर्वी इस्लामपूर आगारामध्ये एसटी चालवली होती. त्याविरोधात भाजपकडून इस्लामपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच जयंत पाटील यांनी बेकायदेशीरपणे एसटी चालवली असा अरोप भाजपकडून करण्यात आला आहे. जयंत पाटील यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर आगारामध्ये जाऊन एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर त्यांनी आगारामध्ये एसटी चालवली होती. त्याविरोधात आता भाजपकडून आक्षेप घेण्यात आला आहे. तसेच एखाद्या सामान्यानं असं केलं असत तर त्वरित गुन्हा दाखल झाला असता मात्र जयंत पाटीलांविरोधात निवेदन द्यावं लागल्याचेही भाजपने म्हटलं आहे

Published on: Aug 17, 2022 05:28 PM
अजित पवार आणि धनंजय मुंडेंविरोधात गद्दार नारेबाजी का केली नाही?
उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कामाचा घेतला आढावा