“उद्धव ठाकरे लेना बँक, तर एकनाथ शिंदे देना बँक”, संतोष बांगर यांच्या टीकेवर दीपक केसरकर म्हणतात….

| Updated on: May 28, 2023 | 3:32 PM

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नव्या संसदभवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांवर टीका केली आहे. एक संसदेच उदघाटन होतंय हा सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे. ज्या पद्धतीने बहिष्कार टाकलाय ते चुकीचा आहे.

मुंबई : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नव्या संसदभवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांवर टीका केली आहे. एक संसदेच उदघाटन होतंय हा सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे. ज्या पद्धतीने बहिष्कार टाकलाय ते चुकीचा आहे. त्यांनी या क्षणाचे साक्षीदार व्हायला हवं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये भाषण करत होते त्याचा देशाला अभिमान आहे.ऑस्ट्रेलियामधल्या विरोधी पक्षांनी देखील मोदी यांची स्तुती केली. तरी देखील आपल्या देशातील लोक त्यांच्यावर टीका करतात हे योग्य नाही.पंतप्रधान नेहरू यांनी पहिल्या संसदिय अधिवेशनात राजदंड हाती घेतला होता. मग त्यांनी उद्घाटन केल त्यात काय झालं?, असा प्रश्न दीपक केसरकर यांनी विरोधकांना केला आहे. तसेच संतोष बांगर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांवर दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संतोष बांगर काय बोलले यावर मी काही बोलणार नाही, पण जनतेला सढळ हाताने मदत करणारे शिंदे एकमेव मुख्यमंत्री आहेत, असं दीपक केसरकर म्हणाले.

Published on: May 28, 2023 03:32 PM