Rohit Pawar Tweet: रोहित पवारांची ट्विट करत अजितदादांकडे मागणी
रोहित पवार यांनी ट्विट करत कोल्हापुरातील टी राजांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्याकडे केली आहे.
Rohit Pawar Tweet: रोहित पवार यांची काही दिवसांआधी ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. यानंतर आता रोहित पवार यांनी ट्विट करत कोल्हापुरातील टी राजांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्याकडे केली आहे.
रोहित पवार यांच्या ट्विटमध्ये नेमकं काय?
रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, पुरोगामी अजितदादांनी कोल्हापुरात होणाऱ्या भाजप आमदार टी. राजाच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारावी. पवारसाहेबांना सोडून प्रतिगाणी शक्तींशी संगत केली असली तरी आपल्यातला पुरोगामी विचारांचा दादा तसाच आहे असं मानून टी राजा यांच्या कार्यक्रमास परवानगी देऊ नये ही सामान्य कोल्हापुरकरांच्या वतीने आपणास नम्र विनंती. असं ट्विट करत रोहित पवार यांनी अजित पवारांना आवाहन केलं आहे
मा. अजितदादा,
आपण नेहमीच पुरोगामी विचारांना आपल्या जीवनात प्राधान्य दिलं आहे. पुरोगामी विचारांचे उद्गाते शहर आणि महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाची वैचारिक राजधानी असलेल्या कोल्हापूर शहरात आपण नुकतंच जाऊनही आलात. कोल्हापूरने नेहमीच महाराष्ट्राला वैचारिक दिशा दिली परंतु याचाच राग… pic.twitter.com/6kZth8Piv3— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 30, 2024