शेती अन् सोलरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्न कसं मिळणार? देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या एका उपक्रमाविषयी माहिती दिली आहे. ते पुण्यात बोलत होते. काय म्हणालेत? पाहा...
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात बोलताना सरकारच्या एका उपक्रमाविषयी माहिती दिली आहे. “सोलर प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची शेती आम्ही भाड्याने घेणार आहोत. त्यासाठी वर्षाला 75 हजार रुपये देणार आहोत. वर्षाला 2 टक्क्यांनी भाड्यात वाढ करणार आहोत. शेतीची मालकी शेतकऱ्यांची असणार आहे. शेतीचं भाडंही मिळणार आणि सोलरपासून वीजही मिळणार आहे. 2017 साली जो दुष्काळ पाहिला तसा आपल्याला परत बघायचा नाही. त्यामुळे त्याची तयारी आपल्याला आतापासून करायची आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
Published on: Mar 12, 2023 02:57 PM