लाडकी योजना बंद करा अशी मागणी घेऊन कॉंग्रेसचे लोक कोर्टात गेले आहेत. आमच्या लाडक्या बहिणींची योजना बंद करण्यासाठी कॉंग्रेसचे नेते अनिल वडपल्लीवार गेले आहेत.जे कॉंगसेचे निवडणूक प्रमुख होते. यांनी एक रुपया पिक विमा योजना आणि लाडकी योजना बंद करायची म्हणून कोर्टात याचिका केली आहे. आम्ही या विरोधात कोर्टात चांगला वकील उभा करुन लाडकी बहीण योजना सुरुच राहील याची व्यवस्था करु असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.आम्हाला या राखीची आण आहे ही योजना आम्ही कधीच बंद पडू देणार नाही अशी गर्जना देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरातील एका कार्यक्रमात केले आहे.